कार्तिक पुजारी
पावसामध्ये भिजण्यास जवळपास सर्वांनाच आवडते. पण जास्त वेळ पावसात भिजल्याने काही काही गंभीर आजार उद्भवू शकतात
सर्दी, ताप, खोकला आणि इतर साथीचे आजार होण्याचा धोका निर्माण होतो
तुम्हाला श्वसनाचा त्रास असल्यास तुम्ही पावसाच्या पाण्यात भिजणे टाळावे. कारण, फुफ्फुसाशी संबंधित आजार निर्माण होऊ शकतात
पावसात भिजल्याने त्वचा रोगाची शक्यता वाढते. वातावरणातील ओलाव्यामुळे जीवाणू, विषाणू, बुरशीजन्य आजार वाढतात
जास्त काळ पावसात भिजल्याने हायपोर्थमिया होतो. यात शरीराचे तापमान कमी होते. थरथरणे आणि श्वास घेण्यास त्रास जाणवू लागतो
पावसादरम्यान दूषित पाणी तोंडात गेल्यानंतर लेप्टोस्पायरोसिस होण्याचा धोका असतो. यात डोळे लाल होणे, पोटदुखी, मळमळ जाणवू शकते
सदर माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. 'सकाळ माध्यम' याची जबाबदारी घेत नाही.