Manoj Bhalerao
प्रत्येक पालकाला आपल्या मुलाची योग्य काळजी घ्यायची असते. परंतु काही वेळा पालक चांगले करण्याच्या आणि आपल्या मुलांना योग्य मार्गावर आणण्याच्या इच्छेने काही गोष्टी करतात ज्यामुळे आपल्या मुलाचे नुकसान होऊ शकते.
अनेकदा मुलांकडून चूक झाली की ती सुधारण्यासाठी पालक त्यांच्यावर टीका करू लागतात. याचा मुलाच्या आत्मविश्वासावर नकारात्मक परिणाम होतो आणि ते स्वतःबद्दल नकारात्मक प्रतिमा विकसित करतात.
मुलाच्या भावना समजून न घेतल्याने किंवा समजून घेतल्यानंतरही त्याकडे दुर्लक्ष केल्याने मूल दुःखी होऊ शकते आणि याचा त्याच्या वाढीवरही विपरीत परिणाम होतो.
मुलांसाठी शिस्त खूप महत्त्वाची आहे, पण अनावश्यक नियम बनवल्याने मुलांचा गोंधळ उडू शकतो. मुलांच्या निरोगी विकासासाठी, नियम स्पष्ट ठेवणे आवश्यक आहे.
मुलाची तुलना दुसऱ्या मुलाशी किंवा स्वतःच्या भावंडांशी केली जाते तेव्हा मुलाच्या मनात मत्सराची भावना निर्माण होऊ लागते.
मुलाची प्राईव्हसी समजून न घेतल्याने ते हिंसक बनू शकतात.
मुलाचे अत्याधिक संरक्षण आणि नियंत्रण त्यांच्या स्वातंत्र्यावर अंकुश ठेवू शकते.
मुलांकडून अवास्तव अपेक्षा ठेवल्याने त्यांच्यावर दबाव निर्माण होतो. अशा परिस्थितीत मुलाकडून तेवढ्याच अपेक्षा ठेवा ज्या तो पूर्ण करू शकेल.
जे काम ते स्वतः करू शकत नाहीत ते काम आपल्या मुलाने करावे अशी प्रत्येक पालकांची इच्छा असते. याचा मुलाच्या व्यक्तिमत्त्वावर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे मुलाच्या स्वप्नांना आधार द्या.