Monika Lonkar –Kumbhar
निरोगी जीवनशैलीसाठी संतुलित आहार आणि व्यायाम महत्वाचा आहे.
व्यायामाच्या ऐवजी तुम्ही योगा किंवा विविध प्रकारचे खेळ ही खेळू शकता.
सुदृढ आरोग्यासाठी प्रत्येकाने न चुकता वेळ मिळेल त्यावेळी नियमित व्यायाम करावा.
व्यसनांचा आपल्या आरोग्यावर दुष्परिणाम होतो. त्यामुळे, व्यसनांपासून लांब रहावे.
सध्या उन्हाळा सुरू असून घामावाटे शरीरातील पाणी कमी होत आहे. त्यामुळे भरपूर प्रमाणात पाणी प्यावे.
उन्हाळ्यातील डिहायड्रेशन टाळण्यासाठी ताज्या फळांच्या रसासोबत ताकाचे ही सेवन करावे.
आजकाल मोबाईलचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. परंतु, मानसिक आणि शारिरीक आरोग्यासाठी मोबाईलचा अतिरेक टाळा.