परफेक्ट ब्रायडल ग्लो हवाय? मग, 'या' टिप्स करा फॉलो

Monika Lonkar –Kumbhar

वेडिंग सिझन

लग्नाच्या दिवशी प्रत्येक तरूणीची इच्छा असते की, ती सर्वात सुंदर दिसावी. यासाठी ती आटोकाट प्रयत्न करत असते. 

Bridal Glow

ब्रायडल ग्लो

लग्नाच्या कित्येक दिवसांच्या आधीपासूनच तरूणींची तयारी सुरू असते.यासाठी, मग ब्युटी ट्रीटमेंट्स, स्किनकेअर आणि हेअरस्टाईल्स इत्यादींची मदत घेतली जाते. 

Bridal Glow

त्वचा चांगली स्वच्छ करा

चेहरा रोज चांगल्या प्रकारे स्वच्छ केल्यामुळे त्वचेच्या समस्या दूर होण्यास मदत होते.

Bridal Glow

फेसवॉश आणि फेस क्लिंजर

चेहरा स्वच्छ करण्यासाठी तुम्ही फेस क्लिंजर, क्लिंजींग मिल्क, माईल्ड फेसवॉशचा वापर करू शकता. तुमच्या त्वचेला सूट होणारे फेस क्लिंजर आणि फेसवॉशचा वापर करावा.

Bridal Glow

टोनरचा करा वापर

त्वचा साफ केल्यानंतर ही कधीकधी त्वचेवरील घाण, धूळ पूर्णपणे निघून जात नाही. त्यामुळे, टोनरचा वापर करणे गरजेचे आहे. टोनरचा वापर केल्यामुळे मेकअप देखील चांगल्या प्रकारे ब्लेंड होण्यास मदत होते. त्यानंतर, त्वचेवर मॉईश्चरायझर लावायला विसरू नका.

Bridal Glow

फेस स्क्रबिंग आवश्यक

आठवड्यातून एकदा स्क्रबिंग करणे हे त्वचेसाठी खूप आवश्यक आहे. स्क्रबिंग केल्यामुळे त्वचेवरील मृत त्वचा निघून जाण्यास मदत होते. स्क्रबिंग करताना तुमच्या त्वचेचा प्रकार लक्षात ठेवा, त्यानुसार स्क्रबची निवड करा. 

Bridal Glow

फेसपॅक महत्वाचा

फेसपॅक हा त्वचेच्या ग्लोसाठी महत्वाचा आहे. फेसपॅक लावल्यामुळे त्वचेच्या समस्या दूर होण्यास मदत होते. कोरफड जेल ही त्वचेच्या सर्व प्रकारांना सूट होते. त्यामुळे, कोरफडपासून बनवल्या जाणाऱ्या फेसपॅकचा त्वचेवर अवश्य वापर करावा. यामुळे, त्वचेवर छान चमक देखील येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bridal Glow