Monika Lonkar –Kumbhar
डोकेदुखी ही खरं तर एक सामान्य समस्या आहे. ही समस्या अनेक कारणांमुळे उद्भवू शकते. आपण बऱ्याचदा या समस्येला सामोरे जातो.
रोजची कामावर जाण्याची धावपळ, नातेसंबंध, करिअर, अभ्यास आणि पैशांची चिंता इत्यादी कारणांमुळे डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो.
या डोकेदुखीमुळे अनेकांची झोप उडते. त्यामुळे, यावर वेळीच उपचार नाही केले, तर ही डोकेदुखी आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. ही डोकेदुखी दूर करण्यासाठी मग, अनेकजण औषधे आणि गोळ्यांचा आधार घेतात. ज्यामुळे, तुम्हाला तात्पुरता फरक पडतो.
आल्यामध्ये मोठ्या प्रमाणात अँटी-इंफ्लेमेंटरी गुणधर्म आढळून येतात. ज्यामुळे, आपली डोकेदुखी दूर होण्यास मदत होऊ शकते. जेव्हा तुम्हाला डोकेदुखीचा त्रास जाणवेल तेव्हा, हा आल्याचा गरमागरम चहा अवश्य प्या.
लव्हेंडर टी चा सुगंध हा तुमचा ताण-तणाव दूर करण्यास मदत करतो. त्यामुळे, या चहाचे सेवन केल्याने, तुमचे मन शांत राहते आणि डोकेदुखीपासून तुम्हाला आराम देखील मिळतो.
कॅमोमाईल हा अँटीऑक्सिडंट्सचा समृद्ध स्त्रोत आहे. त्यामुळे, याचा चहा देखील आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. या चहामध्ये असे गुणधर्म आढळून येतात. जे आपली डोकेदुखी, ताण-तणावाची सुट्टी करतात आणि आपल्याला आराम मिळवून देतात.
हा चहा प्यायल्याने आपले मन शांत राहते आणि आपल्याला चांगली झोप देखील लागते. त्यामुळे, जर तुम्हाला ताण-तणावाची समस्या किंवा डोकेदुखीची समस्या भेडसावत असेल, तेव्हा या कॅमोमाईल टी चे अवश्य सेवन करा.