Aishwarya Musale
अन्नपदार्थांमध्ये स्वाद आणण्यासाठी मसाले हा सर्वात महत्त्वाचा घटक मानला जातो.
पण तुम्हाला माहीत आहे का की हे मसाले तुमच्या आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहेत.
आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत की हळद, दालचिनी, काळी मिरी आणि धणे हे मसाले तुमच्या आरोग्यासाठी कसे उत्तम आहेत.
हळदीमध्ये अँटीऑक्सिडेंट कर्क्यूमिन असते, जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. हळद पचनाशी संबंधित समस्या आणि हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधित आजार दूर करण्यास मदत करतात.
दालचिनीमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, लोह, कॅल्शियम आणि मॅग्नेशियमसारखे घटक असतात. दालचिनी मधुमेहाच्या रुग्णांसाठी रामबाण औषध आहे. दालचिनीचे जास्त सेवन केल्याने यकृताचा त्रास होऊ शकतो.
काळी मिरीमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि बॅक्टेरियाचे वाढ थांबवणारे गुणधर्म असतात. याशिवाय काळी मिरी पचनक्रिया सुरळीत ठेवण्यास मदत करतात.
धणे हे पचनाशी संबंधित समस्येसाठी फायदेशीर आहेत.
कोलेस्टेरॉलची पातळी सुधारण्यासोबतच ते रोगप्रतिकारशक्ती देखील सुधारते.