Anuradha Vipat
आजकालच्या तरुणाईला प्रेम आणि आकर्षण यातील फरक समजत नाही.
तुम्हाला पहिल्या नजरेत एखाद्याबद्दल आकर्षण वाटू शकते, प्रेम नाही.
आकर्षण खूप जलद होते आणि थोड्या काळासाठी टिकते तर प्रेमाला खूप वेळ लागतो
प्रेम शब्दात व्यक्त करणं सोपं नसतं. प्रेमात आपुलकीची इतकी खोल भावना असते की ती फक्त तुम्हीच अनुभवू शकता
एखादी आवडती व्यक्ती अचानक दूर गेली आणि याचा तुमच्या मानसिक परिस्थितीवर काहीही परिणाम झाला नाही तर समजून जा की हे फक्त आकर्षण आहे
तसेच एखादी आवडती व्यक्ती अचानक दूर गेली अन् तुम्ही मनाने डिस्टर्ब किंवा कमजोर झाला असाल आणि सतत त्यांच्याशी संपर्क साधावा वाटत असेल तर तुमचं त्या व्यक्तीवर खरं प्रेम आहे समजून जा.