सोलो ट्रिपला जाताय? मग, 'या' गोष्टी बॅगेत पॅक करायला विसरू नका

Monika Lonkar –Kumbhar

सोलो ट्रॅव्हलिंग

फिरायला जायला तर सगळ्यांनाच आवडते. मात्र, तुम्ही कधी सोलो ट्रिपला गेले आहात का? सोलो ट्रिपला जाण्याची एक वेगळीच मजा असते. 

Travel Tips

आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक आहेत की, ज्यांना एकटे फिरायला आवडते. हे लोक स्वत:ची मस्त कंपनी एंन्जॉय करतात

Travel Tips

बॅग पॅकिंग

जेव्हा तुम्ही एकटे फिरायला जाता, तेव्हा आसपासचा परिसर एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याची संधी तुम्हाला मिळते. मात्र, जेव्हा तुम्ही एकटे फिरायला जाता तेव्हा, त्या ट्रिपची संपूर्ण तयारी तुम्हाला करावी लागते. खास करून बॅग पॅकिंग करणे. 

Travel Tips

महत्वाच्या कागदपत्रांची प्रत

जेव्हा तुम्ही एकटे फिरायला जाता, तेव्हा तुम्हाला तुमच्या वैयक्तिक ओळखपत्राची गरज केव्हाही पडू शकते. त्यामुळे, प्रवासात महत्वाच्या कागदपत्रांची झेरॉक्स सोबत ठेवायला विसरू नका. एखादा फोटो, आधारकार्डची झेरॉक्स, पासपोर्ट्स, बोर्डिंग पासेस किंवा इतर महत्वाच्या कागदपत्रांची एक प्रत नक्की सोबत ठेवा. 

Travel Tips

सेफ्टी किट

सोलो ट्रिपला जाताना बॅग पॅकिंग करताना सोबत सेफ्टी किट ठेवायला विसरू नका. या सेफ्टी किटमध्ये तुम्ही टॉर्च, कात्री, शिट्टी आणि चिकटपट्टी, पेन, डायरी यांचा समावेश करू शकता.

Travel Tips

सर्वात महत्वाचे मोबाईल चार्जर आणि पॉवरबॅंक सोबत ठेवायला अजिबात विसरू नका. प्रवासामध्ये याची सर्वाधिक गरज तुम्हाला पडू शकते.

Travel Tips

आवश्यक औषधे

एकटे फिरायला गेल्यावर तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्यायला हवी. प्रवासादरम्यान काही आरोग्याच्या समस्या उद्भवल्यास तिथे लगेच दवाखाना किंवा मेडिकल उपलब्ध असेलच याची काही खात्री नसते. त्यामुळे, तुमच्यासोबत आवश्यक औषधे आणि गोळ्यांचे किट नक्की सोबत ठेवा.

Travel Tips

जगातील सर्वात सुरक्षित देशांच्या यादीमध्ये 'या' देशांचा समावेश

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Travel Diaries | esakal
येथे क्लिक करा.