Monika Lonkar –Kumbhar
वजन कमी करण्यासाठी अनेक जण व्यायाम आणि संतुलित आहाराची मदत घेतात.
मात्र, अनेकदा लोक या अन्नपदार्थांमध्ये असलेले पोषण आणि कॅलरीजबद्दल गोंधळून जातात. कोणत्या खाद्यपदार्थांचा आहारात समावेश करावा आणि कोणत्या करू नये? याबाबत लोकांचा संभ्रम दिसून येतो.
शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी काही जण अनेक प्रकारचे डाएट फॉलो करू लागतात. मात्र, तरी ही काय खावे आणि काय खाऊ नये हे ठरवणे काहींसाठी अवघड होऊन बसते. त्यामुळे, आज आम्ही तुम्हाला झीरो कॅलरी फूड्सबद्दल सांगणार आहोत.
वजन कमी करण्यासाठी आणि हाडांच्या बळकटीसाठी किवी हे फळ अतिशय फायदेशीर आहे. त्यामुळे, तुमच्या आहारात किवीचा जरूर समावेश करा.
किवीचा समावेश केल्याने शरीरात जमा झालेली अतिरिक्त चरबी बर्न होण्यास मदत होऊ शकते. किवीमध्ये आढळणाऱ्या फायबर्समुळे आपल्याला वारंवार भूक लागत नाही आणि पोट भरलेले राहते.त्यामुळे, वजन कमी करण्यासाठी किवी हे फळ अतिशय फायदेशीर आहे.
पॉपकॉर्न हा हेल्दी स्नॅक्ससाठी उत्तम पर्याय आहे. पॉपकॉर्नचे सेवन केल्याने शरीरातील लोह, मॅग्नेशिअम आणि झिंकची कमतरता पूर्ण होते.
पॉपकॉर्नमध्ये झीरे कॅलरीज आढळून येतात. त्यामुळे,पॉपकॉर्नचे सेवन केल्याने जास्त वेळ भूक देखील लागत नाही.विशेष म्हणजे पॉपकॉर्नमध्ये फायबर्स देखील आढळून येतात, त्यामुळे, शरीरातील ऊर्जेची पातळी कायम राहण्यास मदत होते आणि वजन ही कमी होते.
मूळ्यामध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी आढळून येते, त्यामुळे, वजन कमी करण्यासाठी मूळा अतिशय फायदेशीर आहे. त्यामुळे, तुमच्या आहारात मुळ्याचा जरूर समावेश करा आणि वजन कमी करण्याचा प्रवास आणखी सोपा करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.