Anuradha Vipat
अभिनेत्री सुष्मिता सेनने ‘मिस युनिव्हर्स’चा किताब जिंकलेला त्याला आज तीस वर्षे पूर्ण झाली आहेत
त्यानिमित्ताने इन्स्टाग्रामवर सुष्मिताने एका चिमुकलीसोबतचा फोटो शेअर करत भावना व्यक्त केल्या आहेत.
सुष्मिताच्या कडेवर असलेली ही चिमुकली तिचीच मुलगी रेने आहे. रेनेला सुष्मिताने अनाथाश्रमातून दत्तक घेतलं होतं.
पोस्टमध्ये सुष्मिताने लिहिल आहे ‘अनाथाश्रमात भेटलेल्या या चिमुकल्या मुलीने मला मी 18 वर्षांची असताना आयुष्यातील सर्वांत निरागस आणि तितकीच महत्त्वपूर्ण शिकवण दिली.
पुढे, कॅमेऱ्यात टिपलेला हा क्षण 30 वर्षांपूर्वीचा आहे, जेव्हा भारताने ‘मिस युनिव्हर्स’ स्पर्धेत आपला पहिला विजय मिळविला होता. तेव्हापासूनचा हा प्रवास अत्यंत अद्भुत राहिला आहे’ असं लिहित तिने चाहत्यांचे आभार मानले आहेत.
आजही मुलीला दत्तक घेण्याच्या निर्णयाबाबत सुष्मिता सेनचं खूप कौतुक केलं जातं.