सकाळ डिजिटल टीम
मराठी आणि बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते नाना पाटेकर हे त्यांच्या कमाल अभिनयामुळे प्रसिद्ध आहेत.
पण तुम्हाला माहितीये का ? १९९९ मध्ये झालेल्या कारगिल युद्धात सहभागी होणारे ते एकमेव भारतीय अभिनेते होते. याविषयीची आठवण त्यांनी एका मुलाखतीत सांगितली.
द लल्लनटॉप ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं कि,"तत्कालीन संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांना मी फोन केला आणि युद्धात सहभागी होण्याची इच्छा व्यक्ती केली. त्यावेळी मी सिनेमासाठी कमांडो ट्रेनिंग ३ वर्षात पूर्ण केलं होतं तसंच मी राष्ट्रीय स्तरावरचा नेमबाज होतो. "
"फर्नांडिस साहेबांना ही पार्श्वभूमी माहिती होती. सुरुवातीला त्यांनी नकार दिला पण नंतर त्यांनी मला विचारलं कि मला सैन्यात कधी सहभागी व्हायला आवडेल ? त्यावर मी लगेच असं उत्तर दिलं. त्यांनी परवानगी दिली. "
"मी क्विक रिअक्शन दलात होतो. मी युद्धात गेलो तेव्हा माझे वजन ७६ किलो होते. जेव्हा परत आलो तेव्हा माझं वजन ५६ किलो झालं होतो. पण त्यापेक्षा मी देशासाठी काही करू शकलो याचा मला आनंद अधिक आहे. " असं त्यांनी सांगितलं.
त्यावेळी नानांचे सैन्यातील फोटो वृत्तपत्रांमध्ये छापून आले होते. देशभरातून त्यांच्या या कृतीच कौतुक झालं होतं.
नाना पाटेकर यांनी जीवाची पर्वा न करता आणि करिअरची तमा न बाळगता देशासाठी काहीतरी करायचे ठरवले आणि त्यात ते यशस्वीही झाले.