kimaya narayan
बॉलिवूडमधील सगळ्यांना धक्का देणारा गाजलेला ब्रेकअप म्हणेज सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांचा. अतिशय नाट्यपूर्ण पद्धतीने त्यांचं नातं तुटलं. ऐश्वर्या आणि सलमानचं भांडण, ऐश्वर्याने सोडल्यानंतर सलमानने सेटवर येऊन घातलेला गोंधळ, तिला केलेली मारहाण यामुळे हे प्रकरण खूप गाजलं होतं.
एकेकाळी तरुणाईची लाडकी जोडी असलेली शाहिद कपूर आणि करिना कपूर यांच्या ब्रेकअप अनेकजण चक्रावले. बऱ्याच काळाच्या रिलेशनशिपनंतर त्या दोघांचं ब्रेकअप झालं. शाहिदची कमी असलेली संपत्ती आणि त्यांचा लीक झालेला व्हिडीओ यामुळे त्यांच्यातील दुरावा वाढला असं म्हटलं जातं.
जवळपास दहा वर्षांच्या रिलेशनशिपनंतर जॉन अब्राहम आणि बिपाशा बसू यांचा ब्रेकअप झाला. जॉनने बिपाशाला फसवून प्रिया रुंचालशी लग्न केलं असं म्हटलं जातं म्हणूनच तिने नातं तोडलं अशी चर्चा होती.
2000च्या दशकात लोकप्रिय झालेली जोडी म्हणजे रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण. रणबीर आणि दीपिकाचा काही वर्षांच्या रिलेशनशिपननंतर त्यांचा ब्रेकअप झाला. रणबीरने दीपिकाला फसवल्याचा आरोप करण्यात आला होता.
कंगना रनौत आणि अध्ययन सुमन यांनी राज द मिस्ट्री या सिनेमामुळे त्यांच्या रिलेशनशिपला सुरुवात झाली. पण नंतर खूप आरोप-प्रत्यारोप करून त्यांचं रिलेशन संपुष्टात आलं.
रणवीर सिंह आणि अनुष्का शर्मा यांचं बँड बाजा बारात या सिनेमापासून त्यांच्या रिलेशनशिपला सुरुवात झाली. पण त्यानंतर काही काळातच त्यांचा ब्रेकअप झाला. पण त्याचा त्यांच्या मैत्रीवर काहीही परिणाम झाला नाही.
रणबीर आणि कतरीना ही आणखी एक चर्चेत राहिलेली जोडी. अजब प्रेम कि गजब कहानी मालिकेच्या सेटवर ही लव्हस्टोरी सुरु झाली. त्यांच्या ब्रेकअपला काहीजण नीतू कपूर यांना जबाबदार धरतात.
साजिद खान आणि जॅकलिन फर्नांडिस हे सुद्धा बराच काळ रिलेशनशिपमध्ये होते. पण नंतर काही कारणामुळे त्यांच्यात दुरावा आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.