सकाळ डिजिटल टीम
अभिनेत्री कंगना रनौतने भारतीय राजकारणात यंदा सक्रिय प्रवेश केला असून मंडी मतदारसंघातुन लोकसभा निवडणूक लढवत विजयी झाली. काँग्रेसचे विक्रमादित्य सिंह यांचा तिने पराभव केला. कायम बेधडक वक्तव्यामुळे कंगना चर्चेत राहिलीये. जाणून घेऊया तिच्या काही गाजलेल्या वक्तव्यांविषयी.
हिंदू-मुस्लिम असो किंवा देशातील इतर कोणतीही समस्या कंगनाने प्रत्येकवेळी तिच्या स्टाईलने सोशल मीडियावर मत मांडत वाद ओढून घेतलाय.
घरात काँग्रेस पक्षाची परंपरा असताना कंगना लॉकडाऊनच्या काळात मोदी समर्थक म्हणून पुढे आली. २०१४ ला भारताला स्वातंत्र्य मिळालं हे असो किंवा नेपोटीझम आणि काँग्रेसचा संबंध प्रत्येकवेळी तिचे वादग्रस्त मुद्दे चर्चेत राहिले आहेत.
एका कार्यक्रमात कंगनाने वक्तव्य केलं कि १९४७ मध्ये भारताला भीक म्ह्णून स्वातंत्र्य मिळालं आणि २०१४ मध्ये भारत खऱ्या अर्थाने स्वतंत्र झाला असं म्हंटलं त्यावरून खळबळ झाली होती.
तिच्या या वक्तव्याने सगळ्यांनाच धक्का बसला तर अनेकांनी तिने स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान केला अशी टीका केली यात खुद्द भाजपाचे नेते वरुण गांधीही सामील होते.
लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान द्वेषपूर्ण वक्तव्य आणि जातीय हिंसा भडकवल्याबद्दल कंगनावर पश्चिम बंगालमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. तिने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची प्रतिमा खराब केल्याचं तक्रारीत म्हंटलं.
ममता बॅनर्जींवर हिंसाचाराबाबत थेट टीका केल्याने तिला काही काळासाठी ट्विटरवरून बॅन करण्यात आलं.
२०२० मध्ये कंगनाने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली. बॉलिवूडमधील माफियांपेक्षा मुंबई पोलिसांनी तिचा छळ केला असं ती तेव्हा म्हणाली होती.
निवडणूक प्रचारादरम्यान कंगनाने सुभाषचंद्र बोस यांना देशाचे पहिले पंतप्रधान म्हंटल होतं. यावरून बराच वाद झाला होता आणि अनेकांनी कंगनावर टीका केली होती.
या टीकेवर उत्तर देताना कंगनाने इतिहासाचा आधार घेतला आणि सुभाषचंद्र बोस यांनी १९४५ साली स्वतःला स्वतंत्र भारताचा पंतप्रधान जाहीर केलं होतं असं म्हंटलं होतं आणि याचा अभ्यास तिने तिची आगामी फिल्म बनवताना केला याचा खुलासा तिने केला.
२०२० साली कंगनाने एका वादात अभिनेत्री उर्मिला मातोंडकरचा उल्लेख सॉफ्ट पॉर्नस्टार म्हणून केला. त्यामुळे अनेकजण तिच्यावर चिडले होते.
खासदार झाले तर अभिनयक्षेत्र सोडेन असं कंगना म्हणाली होती आता ती तिचा शब्द पाळणार का ? या कडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.