Amit Ujagare (अमित उजागरे)
वैशाखी पौर्णिमेला सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला, याच दिवशी त्याला ज्ञान प्राप्ती झाली अन् महापरिनिर्वाणही झालं, त्यामुळं याला बुद्ध पौर्णिमा संबोधलं जातं.
बुद्धाच्या पुढील अष्टांगिक मार्गानं जर तुम्ही जाल तर तुमच्या जीवनाला चांगली दिशा मिळू शकेल.
निसर्ग नियमाविरुद्ध कोणतीही गोष्ट होऊ शकते ही गोष्ट न मानणे.
म्हणजे योग्य निर्धार, विचार.
करुणायुक्त व सत्यपूर्ण वाचा (बोल) ठेवण्याचा प्रयत्न करणे.
उत्तम कर्म म्हणजे योग्य कृत्ये करणे.
वाईट मार्गाने आपली उपजीविका न करता ती सन्मार्गानेच करणे.
वाईट विचार निर्माण झाल्यास त्याचा त्वरित नाश करणे.
तात्त्विक गोष्टींचे स्मरण करून चित्तास (मनाला) जागृत ठेवणे.
कोणत्याही वाईट विकारांना स्पर्श होऊ न देता दुष्ट प्रवृत्तींपासून मन अलग ठेवून चित्त प्रसन्न आणि शांत ठेवणे