Payal Naik
राजेश यांनी आपल्या आयुष्यात ती लोकप्रियता अनुभवली जी क्वचितच इतर कुणी अनुभवली असेल.
मात्र अमिताभ बच्चन यांनी त्यांची ही लोकप्रियता संपवली असं म्हटलं जातं. त्याला कारण ठरला आनंद हा चित्रपट.
या चित्रपटाचं दिग्दर्शन ऋषिकेश मुखर्जी यांनी केलं होतं. या चित्रपटावेळी ऋषिकेश यांनी दोघांना तुम्हाला हवी ती भूमिका निवडा असं सांगितलं होतं.
चित्रपटातील एक व्यक्ती मरणार होता तर दुसरा जिवंत राहणार होता. त्यामुळे मरणारा नेहमी भाव खाऊन जातो म्हणून राजेश यांनी आनंदची भूमिका निवडली.
तर अमिताभ यांच्या वाट्याला दुसरी भूमिका आली. मात्र बिग बी यामुळे खुश नव्हते.
जेव्हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा मात्र कमाल झाली. अमिताभ यांची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती.
अमिताभ यांना हे पाहून सुखद धक्का बसला. त्यानंतर 'लवर बॉय' चा काळ संपला आणि 'अॅंग्री यंग मॅन' चा काळ सुरु झाला.
या चित्रपटानेच राजेश खन्ना यांचं करिअर संपवलं असं म्हटलं जातं.