Anuradha Vipat
वयाच्या 67 व्या वर्षीही तरुणांना लाजवेल असा अनिल कपूरचा फिटनेस आहे
आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अनिल कपूर यांची मुलगी आणि अभिनेत्री सोनम कपूरने वडिलांच्या फिटनेसमागचं रहस्य सांगितलं आहे
सोनम बोलताना म्हणाली की अनिल कपूर कधीच दारु पित नाहीत किंवा त्यांना सिगारेटचंही व्यसन नाही. त्यांच्या फिट आणि हँडसम दिसण्यामागचं रहस्य हेच आहे.
अनिल कपूर हे गेल्या 40 वर्षांपासून बॉलिवूड इंडस्ट्रीत काम करत आहेत
अनिल कपूर हे सुरुवातीच्या काळात थिएटरबाहेर ब्लॅकमध्ये चित्रपटांची तिकिटं विकायचे.
1971 मध्ये त्यांनी ‘तू पायल मैं गीत’ या चित्रपटातून अभिनयाला सुरुवात केली