Anuradha Vipat
बांदेकर कुटुंबाने नुकताच ‘एका युट्यूब चॅनलशी संवाद साधला होता.
यावेळी सुचित्रा बांदेकर यांनी सासूबाईंचा एक किस्सा सांगितला. सध्या त्यांनी सांगितलेला हा किस्सा चांगलाच चर्चेत आला आहे.
सुचित्रा यांना विचारण्यात आलं होतं की, सासरी रुळताना तुम्हाला पारंपरिक रितीरिवाज पाळावे लागले होते का?
यावर सुचित्रा बांदेकर म्हणाल्या, “माझं लग्न झालं तेव्हा मी १९ वर्षांची होते. माझं लग्न झाल्यानंतर लगेचच वटपौर्णिमेचा सण आला होता. मला आदेशच्या आईने कडक उपवास करायचा, असं सांगितलं होतं.
कडक उपवास केल्यानंतर त्या म्हणाल्या, सगळ्यांना नमस्कार केलास…आता जेव, पोटभर खाऊन घे. आता आयुष्यात पुन्हा कधी वटपौर्णिमा केली नाहीस तरी चालेल. माझ्यासाठी हा इतका अफलातून अनुभव होता.
सध्या आदेश बांदेकर व अभिनेत्री सुचित्रा बांदेकर यांचा लेक सोहम हा ‘सोहम प्रोडक्शन हाऊस’ सांभाळत आहे