Anuradha Vipat
अभिनेत्री करीना कपूर सध्या तिच्या आगामी ‘क्रू’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे.
या चित्रपटानिमित्त दिलेल्या एका मुलाखतीत करीना तिच्या खासगी आणि व्यावसायिक आयुष्याबद्दल मोकळेपणे व्यक्त झाली.
मुलाखतीत बोलताना, खुश राहण्यासाठी मानसिक स्वास्थ्य खूप महत्त्वाचं असतं, असं तिने म्हटलं आहे
आयुष्यात प्रसिद्धी, पैसा, करिअर या सर्व गोष्टी असूनही जर मानसिक शांतता नसेल तर त्या सर्वांचा काहीच अर्थ नाही, असंही ती म्हणाली आहे.
पुढे बोलताना ती म्हणाली, “माझ्या मते माझ्याकडे सगळ्या गोष्टी आहेत. पण त्यापैकी माझ्याकडे असलेली सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी खुश आहे. माझ्यासाठी ही गोष्ट खूप महत्त्वपूर्ण आहे
करीनाने नुकतंच ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण केलं आहे