Saisimran Ghashi
रक्षाबंधन हा हिंदू धर्मातील एक प्रमुख सण आहे जो भाऊ-बहीणीच्या प्रेमाचे प्रतीक आहे.
या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधतात आणि भाऊ आपल्या बहिणीचे रक्षण करण्याची शपथ घेतात.
पण आपल्या भारतातच एक असे गाव आहे जिथे रक्षाबंधन साजरे केले जात नाही. ऐकून धक्का बसला ना?
गाझियाबादसारख्या शहरात, जिथे विविध संस्कृतींचे मिश्रण आहे.पण तिथे असे एक गाव जेथे रक्षाबंधन साजरा केले जात नाही.
गाझियाबादपासून ३० किमी अंतरावर असलेल्या मुरादनगरमधील सुराणा हे गाव आहे.
१२ व्या शतकापासून येथे लोक रक्षाबंधनाचा सण साजरा करत नाहीत.
सुराणा गावातील सूना आपल्या भावांच्या मनगटावर राखी बांधतात, पण या गावातील मुली रक्षाबंधनाचा सण साजरा करत नाहीत.
महंमद घोरीने रक्षाबंधनाच्या दिवशी या गावावर हल्ला केला, परिणामी एक महिला आणि तिचे दोन अनुपस्थित मुले वगळता सर्व रहिवासी मरण पावले.
या घटनेनंतर या गावात रक्षाबंधन सन साजरा करणे बंद करण्यात आले.कारण तेथील लोक याला काळा दिवस मानतात.
ही माहिती केवळ सामान्य धारणांवर आधारित आहे.आम्ही याची पुष्टी करत नाही.