Pranali Kodre
आयपीएल 2024 स्पर्धेतील 38 व्या सामन्यात सोमवारी राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सविरुद्ध 9 विकेट्सने विजय मिळवला.
असे असले तरी मुंबई इंडियन्सचा फलंदाज तिलक वर्माने या सामन्यात अर्धशतकी खेळी करत मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.
तिलकने 45 चेंडूत 65 धावा केल्या. यासह त्याने आयपीएलमध्ये 1000 धावांचा टप्पा पार केला आहे. तिलकने 33 व्या डावात आयपीएलमध्ये 1000 धावा पूर्ण केल्या.
त्यामुळे सर्वात कमी डावात 1000 धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तिलक मिस्टर आयपीएल सुरेश रैनाला मागे टाकत दुसऱ्या क्रमांकावर आला.
या विक्रमाच्या यादीत ऋतुराज गायकवाड आणि सचिन तेंडुलकर संयुक्तरित्या अव्वल क्रमांकावर आहेत. त्यांनी 31 डावात 1000 आयपीएल धावा करण्याचा पराक्रम केला आहे.
तसेच तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या रैनाने 34 डावात 1000 आयपीएल धावा केल्या होत्या.
या विक्रमाच्या यादीत ऋषभ पंत आणि देवदत्त पडिक्कल संयुक्तरित्या चौथ्या क्रमांकावर आहेत. त्यांनी 35 डावात 1000 आयपीएल धावा केल्या होत्या.
पाचव्या क्रमांकावर असलेल्या गौतम गंभीरने 36 डावात 1000 आयपीएल धावा केल्या होत्या.