Pranali Kodre
बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात १६ ऑक्टोबरपासून पहिला कसोटी सामना होत आहे.
या सामन्यात न्यूझीलंडकडून पहिल्या डावात ९ व्या क्रमांकावर फलंदाजीला उतरलेल्या टीम साऊदीने ७३ चेंडूत ६५ धावांची खेळी केली.
साऊदीने ही खेळी करताना ५ चौकार आणि ४ षटकार मारले. त्यामुळे कसोटीमध्ये आता साऊदीचे १०३ कसोटीत ९३ षटकार झाले आहेत.
कसोटीमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो आता विरेंद्र सेहवागलाही (९१ षटकार) मागे टाकत सहाव्या क्रमांकावर आला आहे.
विशेष म्हणजे या विक्रमाच्या यादत पहिल्या ५ खेळाडूंमध्ये एकही भारतीय खेळाडू नाही.
कसोटीमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या खेळाडूंच्या यादीत अव्वल क्रमांकावर बेन स्टोक्स आहे. त्याने १०६ सामन्यांमध्ये १३१ षटकार मारले आहेत.
दुसऱ्या क्रमांकावर न्यूझीलंडचा माजी कर्णधार ब्रेंडन मॅक्युलम आहे. त्याने १०१ कसोटी सामन्यांमध्ये १०७ षटकार मारले आहेत.
ऑस्ट्रेलियाचा यष्टीरक्षक फलंदाज ऍडम गिलख्रिस्ट तिसऱ्या क्रमांकावर असून त्याने ९६ कसोटीत १०० षटकार मारले आहेत.
चौथ्या क्रमांकावर वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल असून त्याने १०३ कसोटीत ९८ षटकार मारले आहेत.
दक्षिण आफ्रिकेचा जॅक कॅलिस पाचव्या क्रमांकावर असून त्याने १६६ कसोटीत ९७ षटकार मारले आहेत.
(महत्त्वाचे: आकडेवारी १८ ऑक्टोबर २०२४ पर्यंत)