धनश्री भावसार-बगाडे
जर तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर वेळेचे व्यवस्थापन आवश्यक असते. कारण करायचे खूप काही असते पण त्यासाठी वेळ मात्र मर्यादित असतो हे ओळखायला हवे.
प्रत्येक जण आपल्या कोणत्यातरी कृतीत अनावश्यक वेळ वाया घालवत असतो. अशी कामे, कृती ओळखा आणि तिथे वेळ घालवणे कमी करा.
स्पष्ट, साध्य करण्यायोग्य उद्दिष्टे सेट केल्याने प्रभावी वेळेचे व्यवस्थापन होते. मोठी, गुंतागुंतीची कामे, लहान, आटोपशीर भागांमध्ये विभाजित करा आणि त्यांचे महत्त्व आणि गरज लक्षात घेऊन त्यांना प्राधान्य द्या.
कोरोना नंतर वर्क फ्रॉम होम वाढले आहे. पण कामाची जागा, वातावरण आणि जागच्या जागी वस्तूंची उपलब्धता हे सुद्धी तुमच्या कामाचा ताण कमी करतात आणि कार्यक्षमता वाढवतात.
दिवसभाराचे एक स्ट्रक्चरल वेळापत्रक समोर असेल तर गोंधळ कमी होतो. महत्वाची कामे सुटत नाहीत. लहान मोठ्या सगळ्याचा विचार केल्याने वेळेत सर्व पूर्ण होते. पण यात लवचिकता असणे आवश्यक आहे. गरजेनुसार बदल करावे.
हे काम या वेळेत झालेच पाहिजे असे टाइम टेबल आखून घ्या. ठराविक कामासाठी ठराविक वेळ दिल्याने तेवढा वेळ फक्त त्याच कामावर फोकस करणे शक्य होते. डिस्ट्रॅक्शन कमी होते.
तुमच्या कामातून लक्ष विचलीत करतील असे व्यत्यय कमी करा. यासाठी कामावर फोकस करा. त्या पद्धतीचे वातवरण निर्माण करा. आवाज न येणारे प्लग्ज कानात घाला. स्वतःवर बंधने घालून घ्या.
डिजिटल कॅलेंडर, कार्य व्यवस्थापन अॅप्स आणि उत्पादकता ट्रॅकर्स अशी साधने वापरा. त्यामुळे कामं सोपी आणि सुरळीत होतील कारण हे रिमाइंडर्स देऊ शकतील.
उत्पादकता, सर्जनशीलता आणि कार्यक्षमता टिकून राहण्यासाठी मध्ये मध्ये ब्रेक घेण्याची आवश्यकता असते. त्याचेही नियोजन आवश्यक आहे. त्यामुळे शरीर व मन परत ताजे तवाने होते.
सगळीच कामं स्वतः एकट्याने करणं शक्य नसतं. त्याचा ताण येतो. महत्वाची कामं स्वतःकडे ठेवून इतर कामांची वाटणी करून ती करवून घ्यावी. म्हणजे तुमच्याकडे इतर महत्वाच्या गोष्टींसाठी वेळ उरतो.
सकाळी लवकर उठणे, पुर्ण झोप, व्यायाम, संतुलीत आहार अशा निरोगी आरोग्याच्या सवयी लावून घ्या. त्यामुळे स्टॅमिना, कार्यक्षमता आणि एकाग्रता यात वाढ होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.