आशुतोष मसगौंडे
राज्यात डिसेंबरमध्ये 7500 जगांसाठी पोलीस भरती होणार आहे. यासाठी उमेदवारांनी शारीरिक चाचणीसाठी कशी तयारी करावी हे जाणून घेऊया.
पोलीस भरतीच्या शारीरिक परीक्षेच्या किमान 3-4 महिने आधी तुमचे शारीरिक सराव सुरू करा.
ताकद आणि लवचिकता वाढवणारे वर्कआउट रूटीन विकसित करा.
धावणे, पुश-अप, स्क्वॅट्स, लंग्ज आणि प्लँक्स यासारख्या व्यायामांचा तुमच्या दिनक्रमात समावेश करा.
व्यायामादरम्यान तुम्ही योग्य फॉर्म आणि तंत्र वापरत आहात याची खात्री करा.
उत्तम कामगिरीसाठी योग्य पोषण आणि हायड्रेशन महत्त्वपूर्ण आहे. यासह 7-8 तास झोपही गरजेची आहे.
तणाव नियंत्रित ठेवण्यासाठी ध्यान किंवा दीर्घ श्वासोच्छ्वास यांसारख्या गोष्टींचा योगाभ्यास करा.
लक्षात ठेवा, सातत्यपूर्ण सराव हा पोलीस भारती शारीरिक परीक्षेत यशाची गुरुकिल्ली आहे.