ऋषिकेश साळवी (Rushikesh Salvi)
एकीकडे पावसाने कहर केला असला तरी दिवसभर ढगाळी वातावरणामुळे रोगट परिस्थिती उद्भवली आहे.
पावसाळ्यातील वातावरण विषाणू आणि बॅक्टेरियाच्या वाढीसाठी पोषक असते. पावसाळ्यात पचनसंस्था तुलनेने कमकुवत होते.
लहान मुलांना होणारा त्रास म्हणजे पोटदुखी, उलट्या, जुलाबाच्या तक्रारी, गॅस्ट्रो त्यामुळे मुलांना पावसात जास्त वेळ खेळू देणे तसेच भिजत राहणे चांगले नाही.
दूषित पाण्यामुळे टायफॉईड, मलेरिया, डेंगी, यासारखे आजार होऊ शकतात
पावसाळ्यात पाणी उकळून प्यावे कारण पाणी हा घटक शरिरासाठी महत्वपूर्ण असतो.
पावसाळ्यात रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यसाठी मनुका,अंजीर, नाशपती, डाळिंब, चेरी ,प्लम खावे.
गाईच्या दुधात हळद, सुंठ व तुळशीची पाने उकळून पेय घ्या यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते.
पालेभाज्या,फळे वापरताना मिठाच्या पाण्यात स्वच्छ धुवाव्यात.
रस्त्यावरील उघड्यावरचे तळलेले, आंबवलेले, शिळे अन्न, फास्ट फूड खाऊ नये ते आरोग्यास हानिकारक आहेत.