Anuradha Vipat
तितीक्षा तावडे व सिद्धार्थ बोडके यांचा विवाहसोहळा गेल्या महिन्यात २६ फेब्रुवारीला थाटामाटात पार पडला होता.
थाटामाटात लग्नसोहळा पार पडल्यावर अवघ्या काही दिवसांतच तितीक्षा-सिद्धार्थने कामाला पुन्हा एकदा सुरुवात केली आहे
आज शूटिंगमधून वेळात वेळ काढून तितीक्षाने नवऱ्यासाठी खास जेवणाचा बेत केला होता.
याचा फोटो सिद्धार्थने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
तितीक्षाने सिद्धार्थसाठी मच्छी फ्राय, कोळंबी फ्राय, भात, रस्ता असं मांसाहारी जेवण केलं होतं.
या फोटोला “धन्यवाद बायको…” असं कॅप्शन देत सिद्धार्थने या फोटोवर “कोकण…कोकण” हे गाणं लावलं आहे