Aishwarya Musale
मधुमेहाच्या रुग्णांसाठी साखरेवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठी आहारावर नियंत्रण ठेवणे आणि शरीर सक्रिय ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.
खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि लठ्ठपणा ही देखील मधुमेहाची प्रमुख कारणे आहेत.
चणा डाळ ही देखील मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरते. आज आम्ही सांगणार आहोत की मधुमेहाच्या रुग्णाने कोणती डाळ खावी आणि कोणती खाऊ नये?
मधुमेह रुग्णांनी मूग डाळ खावी. यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर, प्रोटीन्स व मिनरल्स असतात. या डाळीमुळे मधुमेह असलेल्या लोकांचा अशक्तपणा दूर होतो.
मधुमेहाच्या रुग्णांनी उडीद डाळ खाणे टाळावे. तसेच तूप-लोणी किंवा डाळ मखनी खाणे टाळावे.
डाळ ही प्रथिनांचा उत्तम स्रोत आहे. दररोज एक वाटी कडधान्य खाणे आवश्यक आहे.
मूग, आणि हरभरा ही कडधान्ये मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहेत.
डाळ खाल्ल्याने शरीराला पुरेशा प्रमाणात फोलेट, झिंक, लोह आणि आवश्यक जीवनसत्त्वे मिळतात.