मुठभर काळ्या मनुका रोज खाण्याचे भरपूर फायदे, कित्येक आजार राहतील दूर

Aishwarya Musale

उत्तम आरोग्य राखण्यासाठी ड्रायफ्रुट्स खाण्याचा सल्ला मिळतो. दररोज किमान मुठभर ड्रायफ्रुट्स खावे असे सांगितले जाते. ड्रायफ्रुट्समुळे शरीरात पुरेशा प्रमाणात पोषण तत्वांचा पुरवठा होतो.

काहींना ड्रायफ्रुट्समध्ये काळे मनुके खायला प्रचंड आवडतात. काळ्या मनुक्यांचा वापर अनेक पदार्थात केला जातो. काळ्या मनुक्याचे अनेक फायदे आहेत.

काळ्या मनुक्यांमध्ये भरपूर प्रमाणात लोह असते. अँटी- बॅक्टेरिअल, अँटी- व्हायरल, अँटी-ऑक्सिडंट्स, व पोटॅशिअम या घटकांनी समृद्ध काळ्या मनुक्यांचा आहारात समावेश करायला हवा.

अ‍ॅनेमियाग्रस्त रुग्णांसाठी फायदेशीर

लोहाच्या कमतरतेमुळे लाल रक्तपेशी कमी होतात. यासह हिमोग्लोबिनची पातळीही कमी होऊ लागते. अशा परिस्थितीत आहाराकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

आपल्या आहारात काळ्या मनुक्यांचा समावेश करा. यामध्ये असलेले प्रोटीन, व्हिटॅमिन-बी6, व्हिटॅमिन-ई सारखे पोषक घटक, रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त आहे.

कोरड्या खोकल्यासाठी उत्तम

जर तुम्हाला कोरड्या खोकल्याचा त्रास आहे तर, काळ्या मनुक्यांचा नियमित सेवन करा. काळे मनुके रात्री भिजवून सकाळी खाऊ शकता.

खराब कोलेस्ट्रॉल होईल कमी

काळ्या मनुक्यांमध्ये पेक्टिन नावाचे फायबर आढळते, जे खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते. यासोबतच हे हृदयाच्या स्नायू आणि रक्त पेशींना नुकसान होण्यापासून वाचवते. काळ्या मनुक्यासह आपले डाएट फॉलो करा.

अनियमित मासिक पाळी

ही समस्या आजकाल अधिक मुलींना भेडसावत आहे. जर तुम्ही या समस्येपासून जात तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काळ्या मनुक्याचे सेवन करा.

तुम्हाला कच्चा नारळ खाण्याचे फायदे माहित आहेत का?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

येथे क्लिक करा