Monika Lonkar –Kumbhar
टोमॅटोमुळे खाद्यपदार्थांना छान चव येते. अनेक खाद्यपदार्थांमध्ये टोमॅटोचा आवर्जून वापर केला जातो.
टोमॅटोमध्ये पोषणतत्वांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आढळून येते.
त्यामुळे, आरोग्यासोबतच त्वचेसाठी आणि केसांसाठी देखील टोमॅटो फायदेशीर आहे. आज आपण टोमॅटोपासून बनवल्या जाणाऱ्या होममेड स्क्रब्सबद्दल जाणून घेऊयात.
दालचिनी आपल्या आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी फायदेशीर आहे. या फेस स्क्रबसाठी ४ चमचे टोमॅटोचा रस घ्या.
त्यामध्ये, १ चमचा साखर, नारळाचे तेल आणि दालचिनी पावडर मिक्स करा. या सगळ्याची पेस्ट तयार करा आणि चेहऱ्यावर १० मिनिटे स्क्रबिंग करा. २० मिनिटांनी चेहरा धुवून टाका.
आरोग्यासोबतच ग्रीन टी हा आपल्या त्वचेसाठी लाभदायी आहे.
हे फेस स्क्रब बनवण्यासाठी एक पिकलेले टोमॅटो घ्या. त्यामध्ये १ चमचा बेकिंग सोडा, १ ग्रीन टी बॅग मिक्स करा. या सगळ्याची पेस्ट तयार करा आणि चेहऱ्यावर १५ मिनिटे स्क्रब करा. त्यानंतर, चेहरा धुवून टाका.