सकाळ डिजिटल टीम
आपल्यापैकी अनेकांना झोपायला आवडतं. मात्र उशिरपर्यंत झोपण्याची सवय समस्या निर्माण करु शकते.
अधिक काळ झोपल्याने अनेक प्रकारच्या आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागेत. लठ्ठपणासारख्या काही समस्या उद्भवू शकतात.
आज तुम्हाला जास्त वेळ झोपल्यानंतर होणाऱ्या आजारांबद्दल सांगत आहोत.
एका अभ्यासानुसार जास्त वेळ झोप घेतल्याने हृदयविकाराचा धोका वाढतो.
यामुळे शरीराची हालचाल कमी होते आणि साखरेची पातळी वाढण्याचा धोका वाढतो.
खुर्चीवर बसून तासनतास काम करणारे लोक अधिक काळ झोपत असतील त्यांना पाठदुखी, मानदुखी अशा आजारांचा त्रास सुरु होतो.
अधिक काळ झोपल्याने पचनक्रिया मंदावायला लागेत आणि बद्धकोष्ठतेचा त्रासही जाणवयला सुरुवात होते.
अधिक काळ झोपल्याने नैराश्यही येते. एका अभ्यासानुसार हे सिद्ध झाले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.