Swadesh Ghanekar
भारतीय संघाने मागील दोन ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील कसोटी मालिका जिंकल्या आहेत. यंदाच्या दौऱ्यात रोहित शर्मा व विराट कोहली यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत. ऐतिहासिक BGT मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये विराट सातव्या क्रमांकावर आहे.
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये सचिन ३२६२ धावांसह अव्वल स्थानी आहे. १९९६ ते २०१३ या कालावधीत त्याने ९ शतकं व १६ अर्धशतकं BGT मालिकेत ठोकली आहेत.
ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज फलंदाजाने भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत २९ कसोटीत २५५५ धावा केल्या आहेत. त्यात ८ शतकं व १२ अर्धशतकांचा समावेश आहे.
भारताचा दिग्गज फलंदाजाने ऑस्ट्रेलियाची नेहमीच डोकेदुखी वाढवली होती. त्याने १९९८ ते २०१२ या कालावधीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध २९ कसोटीत २४३४ धावा केल्या आहेत. त्यात ६ शतकं व १२ अर्धशतकांचा समावेश आहे. कोलकातावरील २८१ धावांच्या खेळीने इतिहास रचला होता.
दी वॉल राहुल ने १९९६ ते २०१२ या कालावधीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३२ कसोटीत २१४३ धावा केल्या आहेत.
माजी कर्णधाराने भारताविरुद्ध २२ कसोटीत २०४९ धावा केल्या आङेत. नाबाद ३२९ ही त्याची सर्वोत्तम वैयक्तिक खेळी आहे.
भरवशाच्या फलंदाज २०१८-१९च्या ऐतिहासिक विजयाचा खरा नायक होता. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकूण २४ कसोटींत २०३३ धावा केल्या आहेत. त्यात ५ शतकं व ११ अर्धशतकांचा समावेश आहे.
यंदाच्या BGT मालिकेत विराटवरच सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध २४ कसोटीत १९७९ धावा केल्या आहेत. त्यात ८ शतकं व ५ अर्धशतकं आहेत.
ऑस्ट्रेलियाच्या माजी सलामीवीराने भारताविरुद्धच्या १८ कसोटीत ६ शतकं व ८ अर्धशतकांसह १८८८ धावा केल्या आहेत.
विराटप्रमाणे ऑसी फलंदाजावर सर्वांचे लक्ष असेल. त्याने भारताविरुद्ध १८ कसोटींत ६५च्या सरासरीने १८८७ धावा केल्या आङेत. त्यात ८ शतकं व ५ अर्धशतकं आहेत.
BGT मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये वीरू दहावा आहे. त्याने २२ सामन्यांत १७३८ धावा केल्या आहेत.