Amit Ujagare (अमित उजागरे)
एसीमुळं तुमच्या घरातील अथवा ऑफिसमधील आर्द्रता कमी होते. त्यामुळं अस्थमाचा त्रास असणाऱ्यांना अॅटॅक त्रास कमी होतो.
जेव्हा घरात एसी सुरु असतो तेव्हा तुम्ही घराच्या खिडक्या आणि दरवाजे बंद करुन ठेवता त्यामुळं आपोआपच तुमच्या घरात कोणीही सहजासहजी प्रवेश करु शकत नाही.
एसीमुळं घरातील हवामान योग्य प्रकारे नियंत्रित केलं जातं. त्यामुळं लहानमुलांसाठी इनडोअर खेळ किंवा मोठ्यांसाठी ट्रेडमिलवरील व्यायाम करणं सुलभं होतं.
कुत्रा-मांजरी सारख्या पाळीव प्राण्यांचं किटकांपासून संरक्षण होतं. खिडक्या बंद असल्यानं मच्छर, झुरळ किंवा इतर किटक घरात प्रवेश करत नाहीत. तसेच त्यांच्या वाढीसाठी विपरित वातावरण तयार होतं.
माणसाला थंड हवेमध्येच चांगली झोप लागते. त्यामुळं यासाठी एसी हाच सर्वात चांगला उपाय आहे. बेडरुमचं हवामान नियंत्रित राहिल्यानं झोप चांगली लागते.
सर्वसाधारणपणे इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू बराच काळ सुरु राहिल्यानं त्या गरम होतात. या वस्तूंना ओव्हरहिटिंगपासून बचावासाठी एसी लावणं गरजेचं असतं.
ऑफिसमध्ये एसी असल्यानं कर्मचाऱ्यांना तणावमुक्त आणि कम्फर्टेबल वातावरण काम केल्यानं कार्यक्षमताही वाढलेली पाहायला मिळते.
कमी तापमान असल्यानं शरिरातून घाम जाण्याचं प्रमाण कमी असतं. त्यामुळं एसीमध्ये शरिरातील पाण्याची योग्य पातळी राखली जाते. यामुळं कष्टाची काम जर एसीमध्ये केली तरी त्रास होत नाही.
उन्हाळात शेकडो लोक उष्माघातानं मृत्यू पावल्याचं आपण ऐकलं असेल. त्यामुळं अशा प्रकारचा उष्मा वाढल्यानं होणाऱ्या दुर्घटनांना एसीमुळं रोखता येतं.
एसीच्या रुमच्या खिडक्या आणि दरवाजे बंद असल्यानं आतमध्ये गोंगाटाचा त्रास होत नाही. त्यामुळं थंड आणि शांत वातावरणाचा अनुभव घेता येतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.