Sudesh
फ्रान्समध्ये राहणाऱ्या फ्रान्कोइस मेयेर्स या जगातील सर्वात श्रीमंत महिला आहेत. लॉरियल या कॉस्मेटिक कंपनीच्या त्या मालकीण आहेत. त्यांची नेट वर्थ सुमारे 97.5 बिलियन डॉलर्स आहे.
अमेरिकेत राहणाऱ्या एलिस वॉल्टन या जगातील दुसऱ्या सर्वात श्रीमंत महिला आहेत. वॉलमार्टच्या मालकीण असणाऱ्या एलिस यांची नेट वर्थ 71.5 बिलियन डॉलर्स आहे.
ज्युलिया कोच या जगातील तिसऱ्या सर्वात श्रीमंत महिला आहेत. कोच इंडस्ट्रीजच्या मालकीण ज्युलिया यांची नेट वर्थ 61.4 बिलियन डॉलर्स आहे.
या यादीमध्ये चौथ्या क्रमांकावर जॅकलीन मार्स या आहेत. त्यांचा कँडी आणि पेट फूड बिझनेस आहे. त्यांची नेट वर्थ 38.7 बिलियन डॉलर्स आहे.
मॅकेंझी स्कॉट या यादीमध्ये पाचव्या क्रमांकावर आहेत. अमेझॉन कंपनीत त्यांचे 4 टक्के शेअर्स आहेत. त्यांची नेट वर्थ 36.1 बिलियन डॉलर्स आहे.
मिरियम अडेल्सन या जगातील सर्वात श्रीमंत महिलांच्या यादीत सहाव्या क्रमांकावर आहेत. त्यांच्या मालकीचे कित्येक कॅसिनो आहेत. त्यांची नेट वर्थ 34.5 बिलियन डॉलर्स एवढी आहे.
या टॉप 10 यादीमधील एकमेव भारतीय महिला म्हणजे सावित्री जिंदाल. जिंदाल स्टीलच्या मालकीण असलेल्या सावित्रींची नेट वर्थ 31.1 बिलियन डॉलर्स आहे. त्या भारतातील सर्वात श्रीमंत महिला आहेत.
ऑस्ट्रेलियाच्या जिना राईनहार्ट यांची कंपनी मायनिंगचं काम करते. जगातील श्रीमंत महिलांच्या यादीत त्या आठव्या स्थानावर आहेत. त्यांची नेट वर्थ 30.3 बिलियन डॉलर्स आहे.
बिगैल जॉन्सन या अमेरिकेतील महिला या यादीमध्ये नवव्या क्रमांकावर आहेत. त्यांची नेट वर्थ 29.7 बिलियन डॉलर्स आहे.
स्वित्झर्लंडमध्ये राहणाऱ्या रफाएला अपॉन्टे-डिएमंट या जगातील सर्वात श्रीमंत महिलांमध्ये 10व्या क्रमांकावर आहेत. त्यांची नेट वर्थ 28.7 बिलियन डॉलर्स एवढी आहे.