Pranali Kodre
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याला गुरुवारी (२४ ऑक्टोबर) सुरुवात झाली.
पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर हा सामना सुरू असून न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.
यानंतर न्यूझीलंडकडून कर्णधार टॉम लॅथम आणि डेवॉन कॉनव या सलामीवीरांनी चांगली सुरुवात केली होती.
परंतु, भारताचा अनुभवी फिरकीपटू आर अश्विनने आठव्या षटकात टॉम लॅथमला १५ धावांवरच पायचीत केले.
अश्विनच्या गोलंदाजीवर लॅथम कसोटीमध्ये तब्बल ९ व्यांदा बाद झाला. लॅथम अश्विनच्या गोलंदाजीवर सर्वाधिक वेळा बाद होणाऱ्या फलंदाजांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आला आहे.
कसोटीत अश्विनने सर्वाधिक १३ वेळा इंग्लंडच्या बेन स्टोक्सला बाद केले आहे.
त्यापोठोपाठ अश्विनने कसोटीत ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर डेव्हिड वॉर्नरला ११ वेळा बाद केलंय.
अश्विनने लॅथमव्यतिरिक्त इंग्लंडच्या ऍलिस्टर कूक आणि जेम्स अँडरसन यांनाही ९ वेळा कसोटीत बाद केलंय.