सकाळ डिजिटल टीम
सोज्वळ सौंदर्य आणि दमदार अभिनय यामुळे दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवीने स्वतःचा एक वेगळा चाहतावर्ग निर्माण केला आहे.
कोणताही मेकअप न करता सिनेमात काम करण्याचं तिचं कसब आणि सहज अभिनयामुळे ती अल्पावधीतच सगळ्यांची लाडकी बनलीये. तिचा साधेपणा अनेकांना भावतो. जाणून घेऊया तिच्या पाच बेस्ट सिनेमांविषयी.
साई पल्लवीचा सगळ्यात जास्त गाजलेला आणि सगळ्यांना आवडलेला पहिला सिनेमा म्हणजे प्रेमम. एका तरुणाच्या खरं प्रेम शोधायच्या प्रवासाची गोष्ट या सिनेमात आहे. या सिनेमाला आयएमडीबीवर ८.३ रेटिंग आहे.
त्यानंतर साई पल्लवीचा गार्गी हा सिनेमाही प्रेक्षकांना खूप आवडला. आपल्या वडिलांना निर्दोष सिद्ध करण्यासाठी एका शिक्षिकेने दिलेल्या लढ्याची गोष्ट या सिनेमात दाखवण्यात आली आहे.
२०१७ साली रिलीज झालेला 'फिदा' हा असाच एक साई पल्लवीचा उत्तम सिनेमा. या सिनेमात दोन वेगळ्या संस्कृतीतून आलेल्या जोडप्याची आणि त्यांना सामोऱ्या जाव्या लागणाऱ्या आव्हानांची गोष्ट पाहायला मिळते.
चार शॉर्ट फिल्म्स एकत्र करून बनवलेला 'पावा काधीगल' हा साई पल्लवीचा आणखी एक सिनेमा. यात साई पल्लवीने ऑनर किलिंगवर भाष्य करणाऱ्या शॉर्ट फिल्ममध्ये काम केलं आहे.
त्यानंतर तिचा आलेला 'काली' हा सिनेमाही गाजला. दुलकर सलमानचीही यात मुख्य भूमिका होती.