Pranali Kodre
टी20 क्रिकेटमध्ये एक षटकही सामन्याचा निकाल पालटवण्यासाठी महत्त्वाचे ठरू शकते.
त्यातही सामना रोमांचक असेल, तर शेवटचे म्हणजेच 20 वे षटक अत्यंत महत्त्वाचे ठरते. याच षटकात दबाव हाताळणे महत्त्वाचे असते.
दरम्यान, टी20 वर्ल्ड कप सामन्यात दुसऱ्या डावात गोलंदाजी करताना 20 व्या षटकात सर्वात कमी धावांचा बचाव करणाऱ्या 5 गोलंदाजांबद्दल जाणून घेऊ.
टी20 वर्ल्ड कप 2024 मध्ये ओमानच्या मेहरन खानने नामिबियाविरुद्ध 20 व्या षटकात 5 धावांचा बचाव करताना 4 धावा खर्च केल्या.
दुसऱ्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिकेचा डेल स्टेन आहे. त्याने टी20 वर्ल्ड कप 2014 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध 20 व्या षटकात 7 धावांचा बचाव करताना 4 धावाच दिल्या होत्या.
न्यूझीलंडचा टीम साउथी तिसऱ्या क्रमांकावर असून त्याने टी20 वर्ल्ड कप 2012 मध्ये श्रीलंकेविरुद्ध 20 व्या षटकात 8 धावांचा बचाव करताना 7 धावा दिल्या होत्या.
अफगाणिस्तानच्या मोहम्मद नबीने टी20 वर्ल्ड कप 2016 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध 20 व्या षटकात 10 धावांचा बचाव करताना अवघ्या 3 धावा दिल्या होत्या.
टी20 वर्ल्ड कप 2016 मध्ये भारताच्या हार्दिक पांड्याने बांगलादेशविरुद्ध 20 व्या षटकात 11 धावांचा बचाव करताना 9 धावा खर्च केल्या होत्या.