Pranali Kodre
आयपीएल 2024 स्पर्धेत 29 मार्च रोजी कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघात सामना झाला.
एम चिन्नास्वामीला झालेल्या या सामन्यात रसेलने दोन विकेट्स घेण्याबरोबरच आयपीएलमध्ये 100 विकेट्स पूर्ण केल्या. त्याने यापूर्वीच आयपीएलमध्ये 2000 हून अधिक धावा केलेल्या आहेत.
त्यामुळे आंद्रे रसेल आयपीएलमध्ये 1000 धावा आणि 100 विकेट्स घेणारा एकूण पाचवा खेळाडू ठरला आहे.
चेन्नई सुपर किंग्सचा अष्टपैलू रविंद्र जडेजाने आयपीएलमध्ये 2500 हून अधिक धावा आणि 150हून अधिक विकेट्स घेतल्या आहेत.
मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्सकडून खेळलेल्या ड्वेन ब्रावोने 1500 हून अधिक धावा आणि 180 हून अधिक विकेट्स आयपीएलमध्ये घेतल्या आहेत.
अक्षर पटेलने आयपीएलमध्ये 1400 हून अधिक धावा आणि 110 हून अधिक विकेट्स घेतल्या आहेत.
कोलकाता नाईट रायडर्सचा क्रिकेटर सुनील नारायणने आयपीएलमध्ये 1000 हून अधिक धावा आणि 160 हून अधिक विकेट्स घेतल्या आहेत.