Pranali Kodre
आयपीएल 2024 स्पर्धेत मंगळवारी (7 मे) राजस्थान रॉयल्सला दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 20 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला.
पण असे असले तरी या सामन्यादरम्यान राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनच्या नावावर एक मोठा वैयक्तिक विक्रम नोंदवला गेला आहे.
सॅमसनने या सामन्यात 46 चेंडूत 86 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने 8 चौकार आणि 6 षटकार मारले.
त्यामुळे सॅमसनने आयपीएलमध्ये 200 षटकार पूर्ण केले आहेत. तो 200 आयपीएल षटकार मारणारा पाचवा भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे.
सॅमसनने 163 व्या आयपीएल सामन्यात खेळताना 159 डावात 200 षटकारांचा टप्पा गाठला. त्यामुळे तो सर्वात कमी डावात 200 आयपीएल षटकार मारणारा भारतीय ठरला आहे.
सॅमसनने धोनीला मागे टाकले आहे. धोनीने 165 डावात 200 आयपीएल षटकारांचा टप्पा गाठला होता.
त्यापाठोपाठ विराट कोहली आहे. त्याने 180 डावात 200 आयपीएल षटकार पूर्ण केले होते.
चौथ्या क्रमांकावर रोहित शर्मा असून त्याने 185 डावात 200 आयपीएल षटकार मारले होते.
पाचव्या क्रमांकावर सुरेश रैना असून त्याने 193 डावात 200 आयपीएल षटकार मारले होते.