Sudesh
जगप्रसिद्ध बॉडिबिल्डर अर्नॉल्ड तुम्हाला माहितीच असेल. तुम्हीदेखील वर्कआऊट जर्नी सुरू करणार असाल, तर त्याने दिलेल्या या टिप्स तुमच्या फायद्याच्या ठरतील.
तुम्हाला जो वर्कआऊट आवडतो तो निवडा. उगाच दुसरे करतात म्हणून त्यांचं अनुकरण करणे टाळा.
तुम्ही शरीराच्या एखाद्या भागावर फोकस करणे टाळा, संपूर्ण शरीराचा वर्कआऊट होईल असा व्यायाम प्रकार निवडा.
आपल्या वर्कआऊटमध्ये कार्डिओचा समावेश करा. ज्यामुळे तुम्हाला अधिक अॅक्टिव्ह वाटेल.
व्यायाम करण्याचे विविध प्रकार आहेत, ते सर्व प्रकार करुन पाहा. यामुळे तुम्हाला आपल्या आवडीचा व्यायाम शोधण्यास मदत मिळेल.
वर्कआऊटसाठी सोबत एखाद्या मित्राची मदत घ्या. यामुळे तुम्ही एकमेकांना मोटिव्हेट करू शकाल.
तुम्ही एक ठराविक लक्ष्य डोळ्यासमोर ठेऊन व्यायाम करा. यामुळे तुम्हाला प्रेरणा मिळत राहील.
तुमचं वय जसं वाढत जाईल, तसं तुम्ही आपल्या वर्कआऊटमध्ये बदल करून घ्या.
वर्कआऊट करण्यासाठी मूड रहावा यामुळे तुमच्या रुटीनमध्ये बदल करत रहा. नवीन व्यायाम प्रकार ट्राय करा.
आपल्या ट्रेनिंगबद्दल अधिकाधिक माहिती घ्या. मी स्वतः अमेरिकेतील टॉप बॉडिबिल्डरकडून ट्रेनिंग घेतलं आहे.
आपला वीकपॉईंट काय आहे हे ओळखून त्यावर काम करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.