शेतकरी घरबसल्या ट्रॅक्टरची सर्व्हिसिंग, जाणून घ्या प्रोसेस

रोहित कणसे

आपल्या कृषीप्रधान देशात ट्रॅक्टर हे शेतीसाठी सर्वात महत्त्वाचे यंत्र आहे.

farmers guide to tractor maintenance

साधारणपणे ट्रॅक्टरच्या सर्व्हिसिंगसाठी शेतकऱ्याला 4 ते 5 हजार रुपये खर्च येतो.

farmers guide to tractor maintenance

प्रत्येक 300 तासांची ड्रायव्हिंग केल्यानंतर ट्रॅक्टरची सर्व्हिसिंग केली पाहिजे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यासाठी सातत्याने पैसे मोजावे लागू शकतात.

farmers guide to tractor maintenance

पण जर काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही जाणून घेतल्या तर तुम्ही घरबसल्या ट्रॅक्टरची सर्व्हिसिंग करू शकता.

farmers guide to tractor maintenance

ट्रॅक्टरची सर्व्हिसिंग करताना पहिल्यांदा इंजिनच्या खालच्या बाजूला लावण्यत आलेला बोल्ट काढा आणि जुने इंजिन ऑइल काढून टाका.

farmers guide to tractor maintenance

त्यानंतर डिझेल फिल्टर उघडा आणि ते स्वच्छ करा. जर ते खूप खराब झाले असेल तर ते बदलून घ्या.

farmers guide to tractor maintenance

तसेच ट्रॅक्टरचे एअर फिल्टर उघडून ते देखील डिझेलने स्वच्छ करून घ्या.

farmers guide to tractor maintenance

यासोबतच फिल्टर ड्रमही कापडाने स्वच्छ करा. यानंतर ट्रॅक्टरचे ब्रेक उघडा आणि डिझेलने स्वच्छ करा आणि धुवा.

farmers guide to tractor maintenance

आता इंजिनखाली बोल्ट घट्ट आवळून बंद करून घ्या आणि फनेलच्या मदतीने ट्रॅक्टरमध्ये नवीन इंजिन ऑइल घाला.

farmers guide to tractor maintenance

यानंतर रेडिएटरमधील कूलंट देखील तपासून घ्या जर ते कमी असेल तर ते भरा.

farmers guide to tractor maintenance

सर्व्हिसिंग दरम्यान ऑइल फिल्टर आणि फिल्टर रबर बदला. आता संपूर्ण ट्रॅक्टरमध्ये गरजेनुसार व्यवस्थितरित्या ग्रीस आणि ऑइल करून घ्या.

farmers guide to tractor maintenance

Donald Trump: ट्रम्प यांच्या विषयीच्या या गोष्टी तुम्हाला माहीत नसतीलच

Donald Trump | sakal
येथे क्लिक करा