IPL 2024 Records : आयपीएलमध्ये पहिल्याच षटकात विकेट घेण्यात कोण आहे आघाडीवर?

अनिरुद्ध संकपाळ

आयपीएलच्या 17 व्या हंगामात 5 गोलंदाजांनी पहिल्याच षटकात विकेट्स घेतल्या आहेत.

या यादीत सर्वात अव्वल स्थान हे राजस्थान रॉयल्सच्या ट्रेंट बोल्टचे आहे. त्याने 4.5 च्या इकॉनॉमीने पहिल्या षटकात 6 विकेट्स घेतल्या आहेत.

त्यानंतर या यादीत नुवान तुषाराचा नंबर लागतो. त्याने पहिल्या षटकात 4 विकेट्स घेतल्या आहेत. त्याची इकॉनॉमी 7 इतकी होती.

या यादीत तिसऱ्या स्थानावर स्वप्निल सिंगचे नाव आहे. त्याने यंदाच्या हंगामात पहिल्या षटकात 3 विकेट्स घेतल्या.

हैदराबादच्या भुवनेश्वर कुमारने यंदाच्या हंगामात पहिल्या षटकात 2 विकेट्स घेतल्या आहे. तो या यादीत चौथ्या स्थानावर आहे.

पाचव्या स्थानावर खलील अहमद असून त्याने 8.4 च्या इकॉनॉमीने पहिल्या षटकात 2 विकेट्स घेतल्या आहेत.

काय सांगता! तब्बल 66 व्या वर्षी या क्रिकेटपटूने केले आंतरराष्ट्रीय पदार्पण

येथे क्लिक करा