Health Tips: कितीही घासला तरी टिफिनचा दुर्गंध काही जात नाही? या टीप्स करतील मदत

Aishwarya Musale

अन्न

अन्न हे पूर्णब्रह्म..असं आपण नेहमी म्हणतो. मात्र बऱ्याच वेळेस असं होतं की हे अन्नपदार्थ आपण जेव्हा डब्यात किंवा टिफीनमध्ये भरून घेऊन जातो, तेव्हा डब्याला अन्नाचा वास लागतो.

food | sakal

दुर्गंध

काही वेळा तो वास पटकन जात नाही आणि डब्यातू एक विशिष्ट दुर्गंध येतो. त्यामुळे आपल्याला त्रास तर होतोच पण डब्यात पुन्हा भरलेल्या ताज्या अन्नालाही त्याचा वास लागतो आणि ते खाववत नाही.

food | sakal

कच्चा बटाटा

जेवणाच्या डब्यातून येणारा तिखट वास दूर करण्यासाठी कच्चा बटाटा एक प्रभावी उपाय ठरू शकतो. एक बटाटा घ्या आणि त्याचे जाड काप करून ते टिफीनच्या आतल्या बाजूने घासून घ्या.

food | sakal

नैसर्गिक

बटाट्यामध्ये असलेले नैसर्गिक एन्झाईम वास निष्प्रभ करण्यास मदत करतात. बटाटा चोळल्यानंतर त्याचे काप टिफिनच्या आत ठेवा आणि झाकण बंद करा.

food | sakal

दालचिनी

दालचिनी ही आनंददायी सुगंध आणि नैसर्गिक दुर्गंधीनाशक गुणधर्मांसाठी ओळखली जाते. ज्यामुळे टिफिनमधील तीव्र गंध दूर करण्यासाठी ती एक प्रभावी घटक ठरते.

food | sakal

डब्यात सुगंध राहतो

त्यासाठी रिकाम्या टिफिनमध्ये एक किंवा दोन दालचिनीच्या काड्या ठेवून झाकण घट्ट बंद करावे. दालचिनीची काडी तीव्र गंध शोषून घेते व डब्यात सुगंध राहतो.

food | sakal

लिंबांच्या सालांचा वापर

रिकाम्या टिफिनमध्ये लिंबाची काही साले टाका आणि झाकण घट्ट बंद करून रात्रभर तसेच ठेवा. लिंबाची साले डब्यातील वास शोषून घेतील.

food | sakal

व्हिनेगरचा वापर

डबा पूर्णपणे रिकामा करून घ्या. व्हाइट व्हिनेगर आणि पाणी समप्रमाणात घेऊन त्याचे मिश्रण तयार करावे. या मिश्रणात टिफीन १५ ते २० मिनिटे बुडवून ठेवा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

food | sakal