सकाळ डिजिटल टीम
सध्या सगळीकडे लग्नासारई सुरु झाली आहे. आणि त्यामुळे नववधूंची सुद्धा तयारी सुरु झाली आहे.
लग्नाबाबत प्रत्येक मुलीची काही स्वप्ने असतात. तिला तिच्या लग्नात सर्वात सुंदर आणि सर्वोत्तम दिसायचे असते.
छोटे छोटे विधीसुद्धा नववधूसाठी खास असतात. या विधींच्या आऊटफिट्सवर काय दागिने घालायचे हा प्रश्न तर पडतोच पडतो. म्हणून मेहेंदीसाठी खास कोणत्या प्रकारचे दागिने घालावे हे पुढच्या टिप्सवरून ठरवा.
तुम्हाला जर वेगळे आणि आकर्षक दागिने ट्राय करायचे असतील तर कवड्यांचे (सी शेल) दागिने एक उत्तम पर्याय आहे. ट्रेंडी लूक्स मध्ये खूप प्रसिद्ध असलेले हे दागिने तुम्ही एथनिक किंवा इंडो-वेस्टर्न दोन्ही आऊटफिट्सवर घालू शकता. हे दागिने तुम्हाला सर्वात वेगळे आणि ठळक दिसण्यात मदत करतात.
मेहेंदीच्या आऊटफिटवर काचेचे(मिरर) दागिने तुमचे सौंदर्य वाढवतात. कपडे असो किंवा दागिने मुली मिरर वर्कला पसंती देतात. काचेचे(मिरर) दागिने तुम्हाला नववधूचा उत्तम लुक देतात.
हिरव्या आणि पिवळ्या रंगाच्या आऊटफिट्सवर गोटा पट्टीचे दागिने चार चांद लावतात. हे चांदीच्या धाग्याने बनवलेले असतात, ज्यामुळे याला एक अनोखा लुक येतो.
ताजी फुले केवळ सुंदर दिसत नाहीत तर मनाला आकर्षित आणि मोहक बनवतात. त्यांच्या सुगंधाने वधूला प्रसन्न आणि ताजे वाटते. तसेच आपण खास असल्याची भावना निर्माण करते.
मेहेंदी समारंभात गोल्ड प्लेटेड दागिने घातल्याने एक रॉयल लुक मिळतो. त्यामुळे तुम्ही क्लासी आणि ग्लॅमरस दिसता.