Monika Lonkar –Kumbhar
मागील काही दिवसांपासून भारतातील केंद्रशासित प्रदेश लक्षद्वीप हे खूपच चर्चेत आले आहे.
लक्षद्वीप हे बेट जवळपास ३६ द्वीपसमूहांनी बनलेले आहे. नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या लक्षद्वीपला भेट दिली होती, तेव्हापासूनच या बेटाची चर्चा होताना दिसत आहे.
या भेटीदरम्यान मोदींनी लक्षद्वीपमधील समुद्रकिनाऱ्यांवर फेरफटका मारला होता. समुद्रात डुबकी मारण्यासोबतच मोदींनी स्नॉर्किंगचा आनंद लुटला होता. तसेच, मोदींनी खास फोटोशूट केले होते आणि याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. त्यामुळे, या लक्षद्वीपची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती.
लक्षद्वीपमधील समुद्रकिनाऱ्यांवर ऑक्टोपस मोठ्या प्रमाणात मिळतात. त्यामुळे, येथील स्ट्रीट फूड्समध्ये ऑक्टोपसचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. शिवाय, येथील स्ट्रीट फूड म्हणून ‘ऑक्टोपस फ्राय’ प्रसिद्ध आहे.
बेबी ऑक्टोपस फ्राय अगदी फिशफ्रायप्रमाणे तळले जातात आणि आवडीने खाल्ले देखील जातात. हे तळलेले आणि कुरकुरीत ऑक्टोपस फ्राय चवीने खाणारे देशी-विदेशी पर्यटक तुम्हाला लक्षद्पीमध्ये दिसतील. लक्षद्वीपमध्ये गेल्यावर हे स्ट्रीट फूड खायला विसरू नका.
ट्यूना नावाचा मासा सर्वत्र चवीने खाल्ला जातो. या माशापासून ही खास डिश बनवली जाते. विशेष म्हणजे कोरड्या ट्यूनापासून हा मास पोडिचाथु पदार्थ बनवला जातो.
लक्षद्वीप या बेटावरील सर्वोत्तम सीफूड म्हणून या पदार्थाचा उल्लेख केला जातो. अनेक पर्यटकांची या सीफूडला पहिली पसंती असते. मुस कवाब या पदार्थामध्ये तेथील अनेक प्रकारच्या माशांचा वापर केला जातो.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.