वर्कआऊट केल्यानंतर खा 'हे' हेल्दी स्नॅक्स, वजन कमी करण्यासोबतच आरोग्य राहील उत्तम

Monika Lonkar –Kumbhar

निरोगी जीवनशैलीसाठी नियमितपणे व्यायाम करणे आणि संतुलित आहार घेणे, गरजेचे आहे. 

Healthy Snacks After Workout

आजकाल लोक या दोन्ही गोष्टींबद्दल जागरूक झाले आहेत. ही एक चांगली बाब आहे. 

Healthy Snacks After Workout

वजन वाढण्याची शक्यता

जर तुम्ही शारिरीकदृष्ट्या सक्रिय नसाल आणि दिवसभर फक्त बसून राहिलात तर तुमचे वजन वाढणार, यात काही शंका नाही. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही वर्कआऊट केल्यानंतर काही हेल्दी स्नॅक्स खाऊ शकता, ज्यामुळे, तुमचे वजन वाढणार नाही.

Healthy Snacks After Workout

केळी

केळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात कर्बोदके आणि पोटॅशिअमचा समावेश असतो. या पोषकघटकांमुळे शरीराला भरपूर ऊर्जा मिळते. वर्कआऊट केल्यानंतर केळ्यांचा आहारात जरूर समावेश करा 

Healthy Snacks After Workout

बेसन चिला

बेसनपीठाचा ग्लायसेमिक इंडेक्स हा कमी असतो. त्यामुळे, यापासून बनवलेल्या पदार्थांचा तुम्ही आहारात समावेश करू शकता. वर्कआऊट केल्यानंतर तुम्ही बेसनपीठापासून बनवलेला चिला खाऊ शकता.

Healthy Snacks After Workout

पनीर सॅलेड

प्रथिनांचा उत्तम स्त्रोत म्हणून पनीरला ओळखले जाते. पनीरचे सेवन केल्याने पोट ही भरते आणि शरीराला आवश्यक असणारे पोषकघटक देखील मिळतात. वर्कआऊट केल्यानंतर तुम्ही पनीरचे सॅलेड खाऊ शकता.

Healthy Snacks After Workout

अंडी

प्रथिने आणि कॅल्शिअमचा प्रमुख स्त्रोत म्हणून अंडी आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहेत. वर्कआऊट केल्यानंतर तुम्ही उकडलेली अंडी खाऊ शकता. यामुळे, तुमच्या थकलेल्या शरीराला ऊर्जा मिळण्यास मदत होईल.

Healthy Snacks After Workout

'या' मराठमोळ्या अभिनेत्रींनी गाजवली हिंदी चित्रपटसृष्टी

marathi actress | esakal
येथे क्लिक करा.