Monika Lonkar –Kumbhar
उन्हाळ्यात वातावरणातील बदलामुळे मच्छरांचे प्रमाण वाढते.
वाढत्या डासांमुळे मग आरोग्याच्या विविध समस्या निर्माण व्हायला सुरूवात होते. घरातील वाढत्या मच्छरांना पळवून लावण्यासाठी फायदेशीर असणाऱ्या घरगुती उपायांबद्दल जाणून घेऊयात.
डासांना पळवून लावण्यासाठी तुम्ही कापूरचा वापर करू शकता. कापूरच्या वासाने डास निघून जातात.
पोषकतत्वांनी परिपूर्ण असलेले कडुलिंब डासांना सळो की पळो करून सोडते. कडुलिंबाची पाने एका पातेल्यात घेऊन ती जाळा आणि त्या धुरामुळे डास पळून जातील.
लसणाच्या पाकळ्यांचा रस काढा, आणि त्यात पाणी मिसळून हे पाणी घरभर शिंपडा, यामुळे मच्छर निघून जाण्यास मदत होईल.
तुळस ही औषधी वनस्पती आहे. या तुळशीच्या पानांचा रस हातापायांवर लावल्याने म्च्छर चावत नाहीत.
नारळाच्या तेलात गवतीचहाची पाने घालून हे मिश्रण गरम करा. आता हे तेल शरीरावर लावा. यामुळे, तुमच्या आसपास डास फिरकणार सुद्धा नाहीत.