Monika Lonkar –Kumbhar
हिवाळ्यात आपण आरोग्यसाबोतच त्वचेची खास काळजी घेतो.
अननसामध्ये व्हिटॅमीन सी आणि बीचे भरपूर प्रमाण आढळून येते. या व्हिटॅमीन्समुळे त्वचेला आणि पचनक्षमतेला भरपूर फायदे होतात. हिवाळ्यातील कोरड्या त्वचेची समस्या दूर करण्यासाठी अननस अतिशय फायदेशीर आहे.
आज आपण कोरड्या त्वचेची समस्या दूर करण्यासाठी आणि त्वचेला सॉफ्ट करण्यासाठी फायदेशीर असलेल्या अननसाच्या फेसपॅक बद्दल जाणून घेऊयात.
ग्रीन टीमध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शिअम,पोटॅशिअम आणि मॅग्नेशिअमचा समावेश आढळून येतो. वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी फायदेशीर आहे. ग्रीन टी मुळे त्वचेतील मृत पेशी निघून जाण्यास मदत होते.
ग्रीन टी आणि अननसाचा फेसपॅक बनवण्यासाठी सर्वात आधी ग्रीन टी ची पावडर २ चमचे घ्या. आता या पावडरमध्ये अननसाचा पल्प मिसळा. हे दोन्ही घटक चांगले एकत्र करा. त्यानंतर, हा फेसपॅक चेहऱ्यावर लावा. १५-२० मिनिटांनंतर चेहरा पाण्याने धुवून टाका.
या फेसपॅकचा उपाय केल्याने तुमची त्वचा तर उजळेल, यासोबतच कोरडी त्वचा नाहीशी होऊन सॉफ्ट त्वचा मिळण्यास मदत होईल.
ग्रीन टी आणि अननसाचा हा फेसपॅक केल्याने कोरड्या त्वचेची समस्या दूर होऊन त्वचेवर छान ग्लो येण्यास मदत होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.