तेलकट त्वचेमुळे त्रस्त आहात? मग ‘हे’ होममेड स्किन टोनर ट्राय करून बघा

सकाळ डिजिटल टीम

पावसाळ्यात त्वचेशी संबंधित बहुतेक समस्या उद्भवतात. काही लोकांच्या चेहऱ्यावर पिंपल्स येतात तर काही लोकांना चेहऱ्यावरील चिकटपणामुळे त्रास होतो.

त्यामुळे त्वचेची काळजी घेणे गरजेचे असते. यात तेलकट त्वचा असलेल्या व्यक्तींना पावसाळ्यात अधिक जपावे लागते.

नाहीतर त्वचेवर पुरळ, खाज सुटू लागते. तुमचीही त्वचा तेलकट असेल तर घरगुती टोनर वापरून चेहरा स्वच्छ ठेवा.

एलोवेरा जेल आणि ग्रीन टी

एलोवेरा जेल त्वचेसाठी चांगले आहे. यामुळे त्वचा हायड्रेट राहते. ग्रीन टीमध्ये अँटीऑक्सिडंट्स देखील असतात ज्यामुळे त्वचेवर पुरळ उठण्याची समस्या कमी होते.

यासाठी एलोवेरा जेल एका लहान भांड्यात काढा. आता ग्रीन टी नीट उकळून घ्या. नंतर थंड होऊ द्या. आता हे टोनर एका स्प्रे बाटलीत ठेवा.

यानंतर, एका कॉटन पॅडने टोनर चेहऱ्यावर लावा. 10-15 मिनिटे तसेच ठेवा आणि नंतर थंड पाण्याने धुवा. यामुळे पावसाळ्यात तुमची त्वचा निरोगी राहते.

गुलाब पाणी आणि काकडी

गुलाबपाणी त्वचेसाठी चांगले असते. यामुळे त्वचा हायड्रेट राहते. यासोबतच तुम्ही काकडीचा रस मिक्स करून चेहऱ्यावर वापरू शकता.

गुलाबपाणी आणि काकडीचे टोनर बनवण्यासाठी तुम्हाला एअर टाईट स्प्रे बाटली घ्यावी लागेल. आता त्यात गुलाब पाणी आणि काकडीचा रस मिसळा. नंतर कॉटन पॅडच्या मदतीने चेहऱ्यावर लावा. साधारण 10 ते 15 मिनिटे चेहऱ्यावर राहू द्या.