सकाळ डिजिटल टीम
तुळशीच्या स्वागतासाठी आपल्या अंगणात रांगोळ्या काढल्या जातात. तुळशीच्या लग्नासाठी तुम्ही एकापेक्षा एक डिझाईन ट्राय करू शकता. काही ५-१० मिनिटांतच काढता येईल अशा डिझाइन्स पाहूया.
साधी सोप्या रांगोळीत विविध रंग वापरून त्यात बासरी, कमल काढून सुंदर अशी रांगोळी काढू शकता.
तुळशीच्या रांगोळ्या काढण्यासाठी बांगड्या, ताट वाटी, दिवे, चमचे यांच्या सहाय्याने काढू शकता.
रांगोळीत तुळशी काढून त्यात शुभ लाभ किंवा तुळशी विवाह असे हि लिहू शकता.
तुळशीच्या लग्नाची रांगोळी साधी, आकर्षक, ट्रिकी डिझाईन अशी वेगवेगळे काढता येईल.
रांगोळीत लाल हिरवा, पिवळा रंग भरून डोली काढून आकर्षक अशी रांगोळी काढू शकता.
साधे चौकटीत रंग भरून, एक सुंदर 3 डी रांगोळी काढू शकता. हे तुळशी वृदांवन खूप सुंदर दिसते.
येथे क्लिक करा....