व्याघ्र दिन : तुम्हाला माहिती आहेत का वाघांच्या या प्रजाती?

Sudesh

बंगाल टायगर

बंगाल टायगरला इंडियन टायगर असंही म्हटलं जातं. जगातील सर्व जंगलांमध्ये आढळणाऱ्या वाघांपैकी अर्धे वाघ हे बंगाल टायगर आहेत. सुंदरबनांमध्ये एकदा ब्रिटिश रॉयल फॅमिलीमधील एका व्यक्तीने या वाघाची शिकार केली, तेव्हापासून याला रॉयल बंगाल टायगर म्हणूनही ओळखलं जातं.

Types of Tiger | eSakal

सैबेरियन टायगर

सैबेरियन वाघांना अमूर टायगर म्हणूनही ओळखलं जातं. रशियामधील बर्च जंगलांमध्ये हे वाघ आढळतात. काही वर्षांपूर्वी कोरियामध्येही हे वाघ आढळत. या नर वाघांचं वजन १८० ते ३०६ किलोपर्यंत असू शकतं. तर, मादी वाघांचं वजन १०० ते १६७ किलो असू शकतं.

Types of Tiger | eSakal

सुमात्रियन टायगर

इंडोनेशियाच्या सुमात्रा बेटांवर आढळणाऱ्या या वाघांना या बेटाचंच नाव दिलं आहे. सुंदा बेटांवरील वाघाची ही एकमेव प्रजाती आहे जी अजूनही टिकून आहे. यांच्या व्यतिरिक्त असणारे बाली आणि जावन टायगर हे आता विलुप्त झाले आहेत.

Types of Tiger | eSakal

कॅस्पियन टायगर

टर्की, इराण, चीन आणि मध्य आशियामध्ये आढळणारी ही वाघांची प्रजाती आता विलुप्त झाली आहे. या वाघांचं डोकं बंगाल टायगरच्या तुलनेत अधिक मोठं होतं. मार्जार कुळातील हे सर्वात मोठे प्राणी ओळखले जात. यांच्या पोटाचा आकारही वेगळा होता.

Types of Tiger | eSakal

जावन टायगर

इंडोनेशियाच्या जावा बेटांवर हे वाघ आढळत. यांच्या अंगावरील पट्टे हे इतर प्रजातींमधील वाघांपेक्षा वेगळे होते. शिकार केल्यामुळे आणि जंगल कमी झाल्यामुळे ही प्रजाती विलुप्त झाली.

Types of Tiger | eSakal

इंडोचायनीज टायगर

वाघांची ही प्रजाती विशेषतः म्यानमार आणि थायलंड देशांमध्ये आढळते. या वाघांच्या शरीरावर २१ ते ३१ पट्टे असतात. या प्रजातीच्या नर वाघाचं वजन १५० ते १९५ किलो असू शकतं, तर मादीचं वजन १०० ते १३० किलो असू शकतं.

Types of Tiger | eSakal

मलायन टायगर

मलेशिया द्विपकल्पांमध्ये वाघांची ही प्रजाती आढळते. सध्या ही प्रजाती विलुप्त होण्याच्या मार्गावर आहे. मलाय भाषेमध्ये या वाघाला हरीमाऊ म्हणतात.

Types of Tiger | eSakal

साउथ चायना टायगर

चीनच्या फुजिआन, हुआन आणि जिआंग्सी प्रांतात हे वाघ आढळतात. जंगलांमधून हे वाघ विलुप्त झाल्याची शक्यता आहे. सध्या केवळ चीनच्या प्राणीसंग्रहालयांमध्ये हे वाघ आढळून येतात. वाघांची ही आकाराने सगळ्यात छोटी प्रजाती आहे.

Types of Tiger | eSakal

बाली टायगर

इंडोनेशियाच्या बाली बेटांवर आढळणारी वाघांची ही प्रजाती विलुप्त झाली आहे. सुमारे ११ ते १२ हजार वर्षांपूर्वी सुंदा बेटांवर ही प्रजाती मोठ्या प्रमाणात होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Types of Tiger | eSakal