अनिरुद्ध संकपाळ
2008 चा 19 वर्षाखालील वर्ल्डकप जिंकून देणारा कर्णधार विराट कोहली पुढे भारताच्या तीनही फॉरमॅटचा कर्णधार झाला. सध्या तो सचिन तेंडुलकरचा शतकांचे शतक ठोकण्याचा विक्रम मोडण्यासाठी मार्गस्थ झाला आहे.
2000 च्या 19 वर्षाखील वर्ल्डकपने भारताला युवराज दिला. कैफच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारताने पहिल्यांदा विजेतेपद पटकावलं. युवरातने या स्पर्धेत 203 धावा आणि 12 विकेट्स घेतल्या.
1998 च्या वर्ल्डकपमध्ये विरेंद्र सेहवाग देखील चमकला होता. सेहवाग फलंदाजीत नाही तर ऑफ स्पिन गोलंदाजी करत भारताच्या विजयात मोलाचे योगदान दिले. पुढे सेहवाग गोलंदाज म्हणून नाही तर धडाकेबाज फलंदाज म्हणून गाजला.
1998 च्या 19 वर्षाखालील वर्ल्डकपमध्ये हरभजन सिंगने 8 विकेट्स घेतल्या होत्या. या कामगिरीनंतर त्याने काही महिन्यातच भारतीय कसोटी संघातून आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं.
रोहित शर्माने 2006 च्या 19 वर्षाखालील वर्ल्डकपमध्ये सहा डावात तीन अर्धशतकी खेळी केल्या होत्या. त्याने 41 च्या सरासरीने 205 धावा केल्या. सध्या तो वरिष्ठ भारतीय संघाचा कर्णधार आहे.
2006 च्या वर्ल्डकपमध्ये रविंद्र जडेजा देखील खेळला होता. तसेच 2008 च्या वर्ल्डकपमध्ये तो विराट कोहलीसोबत संघात होता. त्याने 6 सामन्यात 10 विकेट्स घेतल्या होत्या. 2006 मध्ये त्याने 4 सामन्यात 4 विकेट्स घेतल्या होत्या.
2006 च्या 19 वर्षाखालील वर्ल्डकपमध्ये चेतेश्वर पुजाराने 349 धावा केल्या होत्या. यात एक शतक आणि दोन अर्धशतकांचा समावेश होता. पुढे तो भारतीय कसोटी संघाचा एक प्रमुख फलंदाज ठरला.
2004 च्या वर्ल्डकपमने भारतीय संघाला शिखर धवन सारखा धडाकेबाज सलामीवीर दिला. शिखर हा 2004 च्या 19 वर्षाखालील वर्ल्डकपचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला होता. त्याने 7 डावात 505 धावा केल्या होत्या.
सुरेश रैना हे 2004 च्या वर्ल्डकपमधील एक मोठं नाव आहे. त्याने नंतर वरिष्ठ संघात स्थान मिळवून भारतासाठी अनेक मॅच विनिंग खेळी केल्या.
ऋषभ पंतने 2016 च्या 19 वर्षाखालील वर्ल्डकपमध्ये 44.50 च्या सरासरीने 267 धावा केल्या. यात एक शतक आणि दोन अर्धशतकी खेळी केल्या. त्यानंतर तो भारतीय संघाचा एक प्रमुख खेळाडू झाला आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.